बुलडाणा : देशभरातील महानुभाव सांप्रदायातील अनुयायांचे श्रद्धास्थानअसलेल्या जाळीचा देव येथे सध्या यात्रा सुरू आहे. या यात्रेत देशभरातीलअनुयायी सहभागी झाले आहेत.बुलडाणा- अजिंठा मार्गावर बुलडाण्यापासून ३० किमी अंतरावर जाळीचा देवमहानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामीयांनी बाराव्या शतकात भ्रमंतीवर असताना विश्रांती घेतली होती.तेव्हापासून या ठिकाणी महानुभाव पंथीय अनुयायी दरवर्षी गोळा होतात. गतकाही वर्षांपासून येथे यात्रा उत्सव भरतो. या यात्रा उत्सवात देशभरातूनअनुयायी सहभागी होतात. सध्या येथे यात्रा सुरू असून, देशभरातून भाविक आलेआहेत. येथे धार्मिक वस्तूंसोबतच खेळणे व विविध साहित्याची दुकाने लागलीआहेत. यात्रा महोत्वात दररोज हजारो भाविक दर्शन घेत आहेत.
जाळीचा देव यात्रेत देशभरातील भाविकांचा सहभाग
By admin | Published: February 13, 2017 4:39 PM