डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात खदान असल्याचे आढळून आल्यावर महापौरांनी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तदनंतर त्यांनी नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर सुरू असलेल्या बायो मायनिंगच्या कामाची पाहणी केली. डम्पिंग ग्राउंडवरील ८.५ एकर जागेपैकी २ ते ३ एकर जागेवरचे बायो मायनिंगचे काम पूर्ण झाले असून, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि येणाऱ्या जून जुलैपर्यंत सदर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी जयंत मसने, मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, जलप्रदाय विभागाचे प्र.कार्यकारी अभियंता एच.जी. ताठे, मनपाचे अभियंता नरेश बावणे, शैलेश चोपडे, युसुफ खान, आरोग्य निरीक्षक प्रवीण खांबोरकर आदींची उपस्थिती होती.
महापौरांनी केली डम्पिंग ग्राउंडची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:18 AM