लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील कौलखेड महापौर कबड्डी चषक स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन केले आहे. या स्पध्रेत पुरुषांचे २४ व महिलांचे १२ संघ सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी ही पर्वणी असून, याचा क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल व आयोजन समिती प्रमुख नगरसेविका योगिता पावसाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.स्थायी समिती सभापतींच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर विजय अग्रवाल यांनी स्पर्धेसंदर्भात माहिती दिली. यावेळी सभापती बाळ टाले, नगरसेविका योगिता पावसाळे व सुमनताई गावंडे, गितांजली शेगोकार आदी उपस्थित होते. अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेत कबड्डी क्षेत्रात दबदबा असणारे व उत्कृ ष्ट खेळाडूंचा समावेश असलेले नागपूर येथील मराठा लॉन्सर्स, एकलव्य क्रीडा मंडळ, ओम अमर, आंधळगाव येथील वीर हनुमान, मोहाडी येथील चंद्रज्योत, शिवाजी क्रीडा मंडळ तर पुलगाव येथील नगर स्पोर्टिंग क्लब यासह यवतमाळ येथील जयहिंद क्रीडा क्रीडा संघ, पठाणपुरा व्यायाम शाळा चंद्रपूर तर सर्मथ क्रीडा मंडळ, गाडगेबाबा क्रीडा मंडळ व युवक क्रीडा मंडळ या अमरावतीच्या संघासह खामगाव येथील हनुमान क्रीडा मंडळ व अंबिका क्रीडा मंडळ तसेच वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन, जय जिजाऊ संघ तोंडगाव, अकोला जिल्ह्याचा नावलौकिक असलेला केळीवेळी येथील हनुमान क्रीडा मंडळ, मूर्तिजापूर येथील गाडगेबाबा क्रीडा मंडळ, बोडखा येथील जय सेवालाल संघ तसेच उमरी येथील जगदंबा क्रीडा मंडळ यांच्यासह सेवन यंग स्टार उगवा, यंग क्लब अकोला, जय जगदंबा मंडळ हिंगणी व जिल्हा प्रशिक्षण केंद्र असे एकूण २४ संघ पुरुष गटात सहभागी होणार आहेत.तसेच महिला गटात नागपूर येथील विदर्भ क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, साई क्रीडा मंडळ, सर्मथ क्रीडा मंडळ, आंधळगाव येथील वीर हनुमान मंडळ वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन, जिल्हा प्रशिक्षण केंद्र अकोला, स्टार क्रीडा मंडळ अकोला, जय जगदंबा क्रीडा मंडळ उमरी, प्रशीक क्रीडा मंडळ शिवणी व एकलव्य क्रीडा मंडळ खानापूर इत्यादी संघ महिला गटात सहभागी होणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार o्रीकांत देशपांडे आदींच्या उपस्थित होत असून, समारोप व बक्षीस वितरण ७ जानेवारी रोजी सायंकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती महापौर अग्रवाल यांनी दिली. यावेळी क्रीडा अधिकारी अनिल बिडवे आदी उपस्थित होते.
- अकोला जिल्ह्यातील पुरुष गटात आठ संघ तर महिला गटात पाच संघांना प्रतिनिधित्व देऊन अकोला जिल्ह्याचा मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवून संपूर्ण जिल्हाभर कबड्डी खेळाचा मोठय़ा प्रमाणात प्रसार व्हावा, हा उद्देश आहे.
- या क्रीडा स्पर्धा रिंग रोड कौलखेडजवळील चैतन्यश्वर मंदिराजवळ असलेल्या क्रीडांगणावर ५, ६ व ७ जानेवारी या कालावधीत होणार असून, या ठिकाणी दोन क्रीडांगणे पुरुष गटासाठी तर एक क्रीडांगण महिला स्पर्धा घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्याकरिता स्वतंत्र प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली असून, यावर १५00 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. तसेच इतर प्रेक्षकांकरिता जमिनीवर मॅटीन टाकून तसेच खुच्र्या इत्यादीची व्यवस्था करण्यात येणार आहे.