काय विचारण्यात आले परीक्षेत!
बुद्धिमत्ता चाचणीत ७५ पेक्षा कमी प्रश्न विचारण्यात आले. तसेच गणित व इंग्रजी या विषयांमध्ये अपेक्षित असलेल्या प्रत्येकी ५० पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले. एवढेच नाही तर जिथे अपेक्षित २५ प्रश्न असतात, तेथे मोजकेच ३ ते ४ प्रश्न विचारण्यात आले. पूर्वकल्पना न देता विचारण्यात आलेल्या अशा प्रश्नांमुळे विद्यार्थी चांगलेच गोंधळून गेले आणि भरपूर तयारी करूनही प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे सोडू शकले नाही. हे लक्षात घेता विद्यार्थ्यांची दीड वर्षांची मेहनत वाया गेल्याचे प्रा. कौस्तुभ कोकाटे व विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी लढा देणार
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या घोळामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि नैराश्य पसरले आहे. या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रा. कौस्तुभ कोकाटे यांनी ऑनलाईन रिट पिटीशन दाखल केली आहे. ज्याला हजारो विद्यार्थ्यांचे समर्थन प्राप्त होत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढू, असेही प्रा. कौस्तुभ कोकाटे यांनी सांगितले.