अकोला: शहरातील अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंंत रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी शनिवारी जिल्हाधिकार्यांसोबत महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागेची पाहणी केली. रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत पाडण्याची ग्वाही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यावेळी अधिकार्यांना दिली. शहरातील रस्ते विस्तारीकरणाच्या कामांमध्ये अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंंत ३0 मीटर रुंदीच्या रस्त्याचे विस्तारीकरण मनपामार्फत करण्यात येणार आहे. या रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या कामासाठी या कार्यालयाच्या आवारातील ६ मीटर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मनपाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यासोबत मनपा, भूमिअभिलेख, नगरचना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंती परिसरातील जागेचे मोजमाप करण्यात आले. यावेळी रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याकरिता, जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत पाडण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी मनपाच्या अधिकार्यांना दिली. यावेळी मनपाचे शहर अभियंता अजय गुजर, सहाय्यक नगररचनाकार संदीप गावंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पटोकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ढोणे, मो. युसूफसह पाच उमेदवारांनी घेतले ११ अर्ज अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. चौथ्या दिवशी माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे, भारिप- बहुजन महासंघाचे मोहम्मद युसूफ मो.शफी यांच्यासह पाच उमेदवारांनी ११ अर्ज घेतले. ९ डिसेंबरपर्यंंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेचे मोजमाप
By admin | Published: December 06, 2015 2:29 AM