अकोला - शहरासह जिल्हय़ात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढले असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वातावरणातील बदल तसेच दूषित पाण्यामुळे आणि डासांच्या वाढलेल्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, टायफाइड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण अशा प्रकारचे जलजन्य व कीटकजन्य आजाराने थैमान माजविले आहे. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून, नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डेंग्यूच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
By admin | Published: November 06, 2014 1:03 AM