अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण दाखल होतात; परंतु त्यांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची दुरवस्था झाली आहे. खाटाही मोडकळीस आल्या आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होत असेल, हे निदर्शनास येते.सर्वोपचार रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्यांमुळे रुग्णांची गैरसोय होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. येथे येणाऱ्या रुग्णांच्या प्राथमिक उपचारासाठी उपयोगात आणल्या जाणाºया काही वैद्यकीय साहित्यांची दुरवस्था झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने ईसीजी मशीनचा प्रश्न गंभीर आहे. दररोज शेकडो रुग्णांचे ईसीजी काढण्यात येतात; परंतु मशीन नादुरुस्त झाल्याने डॉक्टर व परिचारिकांनादेखील रुग्णांवर उपचार करण्यास कसरत करावी लागते. याशिवाय, इतर वैद्यकीय उपकरणांमध्येही लहान-मोठे तांत्रिक बिघाड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैद्यकीय उपकरणांसोबतच येथील खाटांची दुरवस्था झाली आहे. बराच वेळ मोडकळीस आलेल्या खाटांवर उपचारासाठी पळून असलेल्या रुग्णांना पाठीच्या आजारांनाही सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.डॉक्टरांसमोर अडचणीनादुरुस्त वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा चुकीचे निदान होत असल्याने रुग्णांच्या डॉक्टरांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यातील बहुतांश डॉक्टर प्रशिक्षणार्थी असल्याने ही बाब गंभीर आहे.वैद्यकीय उपकरणांची प्रतीक्षाऔषध साठ्यासोबतच वैद्यकीय उपकरणांचीदेखील मागणी करण्यात आली होती; परंतु यातील बहुतांश वैद्यकीय उपकरणे अद्याप दाखल झाले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना मोडकळीस आलेल्या उपकरणांचाच उपयोग करावा लागत आहे.