शांतता समितीच्या बैठकीत पातूरचे ठाणेदार हरीश गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी उपसरपंच गोपाल बदरखे यांनी ठाणेदार गवळी यांचा सत्कार केला. बैठकीत ठाणेदार हरीश गवळी यांनी निवडणुकीमध्ये कुठलाही अपप्रचार, गैरवागणूक करू नये, मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत कोणीही विनाकारण थांबू नये, मतभेद विसरून गावात शांतात ठेवावी, असे आवाहन केले. यावेळी सभेला बाभूळगाव बीट जमादार हरिदास अवचार, भवाने, अनुप असंतकार, पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद कुरकुरे, तंटामुक्ती अध्यक्ष शाम बर्डे, पोलीस पाटील देशमुख, माजी सदस्य भीमराव उपर्वट, माजी उपसरपंच गोपाल बदरखे, माजी सरपंच सुभाष खराटे, संतोष बराटे, अमोल गोळे, संजय कराळे, गुणवंत साळोकार, गणेश गोळे, वैभव राऊत, प्रमोद चिकटे, गौरव पताळे, मनोहर उपर्वट, गौतम उपर्वट, धनंजय साळोकार, राजेश साबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)
देऊळगाव येथे शांतता समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:58 AM