लोकमत न्यूज नेटवर्कपारस : पारस प्रकल्प विस्तारीकरणात ६६0 मेगावॉट क्षमतेच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत याबाबत चर्चा होऊन, या विषयावर निर्णय घेण्यासाठी २0 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना केली.नागपूर येथे ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानी ४ सप्टेंबर रोजी पारस येथे ६६0 मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेचा नवीन संच उभारण्याच्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील आ. बळीराम सिरस्कार यांच्यासह सर्वपक्षीय समिती व संबंधित अधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पारस येथे ६६0 मेगावॉट वीज निर्मितीच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता आ.बळीराम सिरस्कार मागील चार वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार करीत आहेत. या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडून सदर प्रकल्पाची आवश्यकता आग्रही शब्दात मांडली. जिल्हाध्यक्ष थोरातांचे आक्रमक रूप पाहून ऊर्जामंत्री बावनकुळे काही क्षण नि:शब्द झाले व त्यांनी या विषयावर निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी अकोला जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी व समन्वय समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत मुंबई येथे २0 सप्टेंबर रोजी निर्णायक बैठक घेण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना केली.पारस परिसरातील गावांमध्ये निर्माण झालेल्या दूषित पाण्याच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक गावात शुद्धजल प्रकल्प उभे करण्यास होत असलेली प्रशासकीय दिरंगाई ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी याबाबत लवकरच प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सामाजिक बांधीलकी अतंर्गत अशा प्रकल्पांची उभारणी करण्याबाबत आश्वासित केले.यावेळी आ. बळीराम सिरस्कार, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेळके,भाजपा तालुकाध्यक्ष विलास पोटे, आकाश पाटील दांदळे, अमोल साबळे, रतन गिरी यांच्यासह समन्वय समितीचे आयोजक मुरलीधर राऊत, श्रीकृष्ण इंगळे, सुरेंद्र रौदळे आदी उपस्थित होते.
पारस प्रकल्प विस्तारीकरणाबाबत २0 सप्टेंबरला मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:46 AM
पारस प्रकल्प विस्तारीकरणात ६६0 मेगावॉट क्षमतेच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत याबाबत चर्चा होऊन, या विषयावर निर्णय घेण्यासाठी २0 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना केली
ठळक मुद्देनागपूरच्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी अधिकार्यांना केली सूचना