क्षयरुग्णांची माहिती सादर करणे बंधनकारक
अकाेला: शहरातून क्षयराेगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य विभागाच्यावतीने कठाेर पाऊले उचलण्यात आली आहेत. खासगी रुग्णालये,क्लिनीकमध्ये क्षयराेगांचा उपचार करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी क्षयराेग आढळून आलेल्या व्यक्तींची माहिती मनपाने दिलेल्या संकेतस्थळावर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास संबंधित रुग्णालये,क्लिनीक विराेधात कारवाइ केली जाइल.
मनपातर्फे काेराेनाविषयक जनजागृती
अकाेला: मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा काेराेना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रार्दूभाव पाहता जनजागृतीसाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी सुध्दा साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले असताना तसे हाेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकाेलेकरांचे जमावबंदीकडे दुर्लक्ष
अकाेला: शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असताना देखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केल्यानंतरही अकाेलेकर याकडे कानाडाेळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
काेराेना चाचणीकडे पाठ!
अकाेला: वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी,खाेकला,अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
गांधी चाैकात अतिक्रमकांना हुसकावले!
अकाेला: शहरातील मुख्य रस्त्यांलगत अतिक्रमण थाटल्यास कारवाइचा इशारा महापालिकेने दिला आहे. आयुक्त निमा अराेरा यांनी १५ फेब्रुवारी पासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरु केली हाेती. यादरम्यान, शुक्रवारी गांधी चाैकात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाइ करण्यात आली. ही कारवाइ सुरूच राहील,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
साेशल डिस्टन्सींगकडे दुर्लक्ष
अकाेला: शहरात मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूची लागण झालेल्या रूग्ण संख्येत वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची लाट लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसे न करता नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. नागरिकांना साेशल डिस्टन्सींगचा विसर पडला आहे.
शहरात नाले,गटारे तुंबली
अकाेला: मनपाच्या आस्थापनेवरील सफाइ कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाइ कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले,सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाइ करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाइ कर्मचाऱ्यांवर आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाइकडे पाठ फिरवल्याने नाले,गटारे तुंबली आहेत.