मतदान यंत्रांचे होणार वाटप!
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील तहसील कार्यालयांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत इलेक्ट्राॅिनिक मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
तहसीलदारांनी घेतली बैठक!
अकोला : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारताना अर्जाची प्राथमिक तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदार लोखंडे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या.
आज, उद्या होणार गर्दी!
अकोला : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी उरला असल्याने, २९ व ३० डिसेंबर या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.
वाहतुकीला अडथळा!
अकोला : शहरातील रेल्वे स्टेशन चाैक ते रेल्वे पुलापर्यंत रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता खोदण्यात आल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, रस्त्यावर पसरलेल्या मातीची धूळ उडत असल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.