अकोला : कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे. सदस्य नोंदणी अभियान ३१ डिसेंबरपर्यंंत राबविण्यात येणार असून, त्यानंतर मे आणि जून महिन्यात संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. यासाठी मंगळवारी मुंबईत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विविध सेल, विभागप्रमुखांची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात कॉँग्रेसमध्ये निलंबन आणि राजीनामा नाट्य रंगले होते. काही पदाधिकार्यांनी तर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीतच उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. निलंबन झालेल्या पदाधिकार्यांची कॉँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत कॉँग्रेसचा जिल्ह्यात सफाया झाल्यानंतर आता जिल्ह्यात पक्षाने संघटनात्मक निवडणुकीसाठी सदस्यता नोंदणीला सुरुवात होणार आहे. यासाठी मंगळवारी मुंबईत जिल्हाध्यक्ष आणि सेलच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अकोल्यातून जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आणि कॉँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. १५ जानेवारी २0१५ पर्यंत सदस्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी
By admin | Published: November 06, 2014 12:49 AM