अकोला : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रविवारी नेहरू पार्क येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह शिवतेज प्रतिष्ठानच्या दहा सदस्यांनी देहदान, तर ४० सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. योगाच्या माध्यमातून निरोगी आरोग्यासह देहदानाचा संकल्पाचा आदर्श निर्माण करणाºया या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कौतुक केले.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, शिवतेज प्रतिष्ठानचे मनोहर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक योगगुरू मनोहर इंगळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर शिवतेज प्रतिष्ठानच्या सदस्यांनी देहदान व नेत्रदानाचा संकल्प केला. संकल्प करणाऱ्यांना आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. दिव्या कुंभारे, डॉ. सुमित मुºहे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. कैलास दुसरे, डॉ. रूपाली पुंडे, डॉ. वैष्णवी बोरकर, डॉ. आशिष सुखदेव, डॉ. श्यामकुमार शिरसाम यांच्यासह त्यांच्या चमूने वैद्यकीय सेवा दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी भेट दिली. संचालन अशोक पेटकर यांनी केले. आभार बाळासाहेब काळे यांनी मानले.यांनी केला देहदानाचा संकल्पबी. एस. देशमुख, किसन बांगर, बाळकृष्ण काळे, निर्मला काळे, जगन्नाथ कठाळकर, विजया अरोरा, शशिकांत उमाळे, उज्ज्वला उमाळे, सीमा राठी, राघव पाठक.यांनी केला नेत्रदानाचा संकल्पमनोहरराव इंगळे, अनुराधा इंगळे, वंदना तायडे, रेवलनाथ जाधव, जसवंतसिंग मल्ली, प्रा. डॉ. सत्यनारायण बाहेती, बाळकृष्ण काळे, निर्मला काळे, अरुणा धुमाळे, शालिनी राठोड, मुकुंद (अरुण) देशमुख विजय केडिया, स्मिता केडिया, किसन बांगर, पुरुषोत्तम गुप्ता, विजय दुबे, विनोद भसीन, मोहन पळसपगार, राघव पाठक, माया जाधव, श्रीकृष्ण सापधरे, कल्पना सापधरे, विजय पाटील, अरुणा पाटील, नरेंद्र राठी, रेखा राठी, मुकुंद देशमुख, संदीप आठवले, रश्मी आठवले, नीता खात्री, शरद शेलूरकर, शुभांगी शेलूरकर, प्रशांत मोरे, शशिकांत उमाळे, उज्ज्वला उमाळे, दिनेश राठी, सीमा राठी, मंगला भिवरकर, अजय मेंडरे, राजेंद्र सुकळकर, प्रकाश मस्के.