शिरपूर जैन (जि. वाशिम): शेतातील वीज वाहिणीच्या लोंबकळलेल्या तारा व्यवस्थित करीत असताना, अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने वाघळूद येथील ३५ वर्षीय रामभाऊ वसंता मस्के नामक शेतकर्याचा रविवारी मृत्यू झाला. वीजपुरवठा बंद असताना, रामभाऊ मस्के व शेलगाव बोराळे येथील शेतकरी विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या तारा व्यवस्थित करण्याचे काम करीत होते. दरम्यान, वीजपुरवठा अचानक सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून रामभाऊ यांचा जागीच मृत्यू झाला. रामभाऊ यांच्याकडे नऊ एकर शेती असून, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या वडीलांचे निधन झाले.खासगी बँकेचे दोन लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, १४ वर्षीय मुलगा अक्षय व ११ वर्षीय मुलगी पूजा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने मस्के कुटुंबावर जणू आभाळच कोसळले आहे.
विजेच्या धक्क्याने घरातील कर्ता पुरुष दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2016 12:55 AM