अकोला : गीतानगर परिसरातील व्यापारी कमलेश ऊर्फ हरीश माहेश्वरी यांना निनावी पत्र आले असून तुझी सर्व दुकाने बंद कर अन्यथा तुझ्या कुटुंबाला जीवे मारू, अशा प्रकारची धमकी देण्यात आली. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्याची गरज हाेती, अशा शब्दात त्यांनी पत्रकार परिषदेत राेष व्यक्त केला. या धमकीमुळे माहेश्वरी कुटुंब भयभीत झाले आहे. या प्रकरणी माहेश्वरी यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गंभीर असतानाही पोलीस यांनी गांभीर्याने घेऊन आरोपीला ताबडतोब अटक करून आम्हाला भयमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
व्यापाऱ्याला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:18 AM