मागील सहा-सात दिवस जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. यादरम्यान जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण हटताच तापमानात पुन्हा वाढ होत आहे. तापमानातील ही वाढ आणखी काही दिवस कायम राहणार आहे. जिल्ह्यात यंदा अनेकदा उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने विदर्भातील तापमान वाढत आहे. रविवारी अकोला जिल्ह्यात विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
--बॉक्स--
अठरा दिवसातील तापमान
दिनांक तापमान
१ एप्रिल४१.६
२ एप्रिल४०.७
३ एप्रिल ४२.०
४ एप्रिल ४२.१
५ एप्रिल४२.५
६ एप्रिल ४२.९
७ एप्रिल ४२.९
८ एप्रिल ४२.०
९ एप्रिल ४१.५
१० एप्रिल ४१.९
११ एप्रिल ३७.८
१२एप्रिल३९.७
१३ एप्रिल४२.१
१४ एप्रिल ४०.१
१५ एप्रिल ३८.६
१६ एप्रिल ४१.०
१७ एप्रिल ४१.०
१८ एप्रिल ४२.२