अकोला : जिल्ह्याचे तापमान दिवसागणिक नवनवीन विक्रम नोंदवीत आहे. अर्धा मे महिना उलटून गेला असून, तापमानात वाढ सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी अकोल्याचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदविले गेले. शनिवारी जिल्ह्याचा पारा ४२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.
----------------------------------------------------
दुधाची आवक कमी
अकोला : कडक निर्बंधांमुळे शहरातील विविध भागांत दुधाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्याकडे जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे. यामध्ये काही जणांकडून दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू आहे.
------------------------------------------------------
कोरोनामुळे उलाढाल ठप्प
अकोला : भारतीय हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा, दिवाळीचा पाडवा, दसरा आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. गुढीपाडवा सणाने हिंदू नववर्षाचा प्रारंभ होत असला तरी अनेकजणांची या निमित्ताने होणारी बाजारातील लाखोंची उलाढाल यावर्षी कोरोनामुळे ठप्प झाली असल्याचे बाजारातील चित्र आहे.
-----------------------------------------------------
गावातील गर्दीवर आले नियंत्रण
अकोला : सध्या कडक निर्बंध करण्यात आले आहेत. त्यामुळे गावाच्या पहारावर तसेच चौकाचौकांत नागरिकांच्या चर्चेवर प्रतिबंध आला आहे. नागरिक आता घरात राहणे पसंत करीत आहेत. बहुतांश ठिकाणी गर्दी नियंत्रणात आली आहे.
-------------------------------------------------------
ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले!
अकोला : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजाराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही घटले आहे.
-----------------------------------------------------------
खासगी शिक्षकांची चिंता वाढली!
अकोला : जिल्ह्यात मोठ्या संख्येने इंग्रजी शाळा आहेत. या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिकविण्यासाठी जातात. यातून त्यांना रोजगार मिळाला आहे; मात्र कोरोनाच्या संकटामुळे या शिक्षकांना आता वेतन मिळणार की नाही ही चिंता सतावत आहे.
------------------------------------------------------------
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ
अकोला : सध्या कोरोनामुळे कडक निर्बंध आहेत. त्यातच शेती हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक कर्जाची रक्कम बँकेत जमा करून आता नवीन कर्ज घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
--------------------------------------------------------------
पशुपालन योजनांच्या जनजागृतीची गरज
अकोला : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.