लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बालकलावंतांनी विविध सामाजिक विषय घेऊन समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला. सुंदर गाव-स्वच्छ गाव या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.स्पर्धेच्या दुसºया दिवशी एकूण नऊ नाटकेसादर करण्यात आली. यामध्ये ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारीचे ह्यकर हर मैदान फतेहह्ण, पांडुरंग भिरड कॉन्व्हेंटचे ह्यसूर्याची मुलगीह्ण, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंटचे ह्यपृथ्वी को बुखार आ गया हैह्ण, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाचे ह्यथोडे आमचेही ऐकाह्ण, माँ शारदा ज्ञानपीठचे ह्यस्काउट गाइड में हंगामाह्ण, आरडीजी पब्लिक स्कूलचे ह्यजिव्हार-एक अंतरमनातील हाकह्ण, साने गुरुजी विद्यालयाचे ह्यसुंदर गाव-स्वच्छ गावह्ण, गीतांजली विद्यालयाचे ह्यदारू नी मेला ओ मायह्ण, हिंदू ज्ञानपीठचे ह्यमरखाना बैलह्ण या नाटकांमधून बालकलावंतांनी आजच्या ज्वलंत सामाजिक समस्या मांडल्या.गावातील रोगराई दूर करावयाची असेल, तर गावात स्वच्छता ठेवणे किती महत्त्वाचे आहे. गावात प्रसन्नता ठेवायची असेल, तर गावाची सुंदरता किती महत्त्वाची आहे, याबाबत सुरेख संदेश दिला. दारू च्या व्यसनापायी किती घरांची राखरांगोळी होते, वनाचे रक्षण, वृक्ष वाचवा, वृक्षतोडीचे परिणाम मानवी जीवनावर कसा झाला, याचा उलगडा चिमुकल्यांनी नाटकातून केला. तसेच सीमेवर लढत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची व्यथादेखील नाटकातून बालकांनी मांडली. मोबाइलच्या अतिवापराने जीवनशैलीत झालेला परिणाम आणि बालकांवर होत असलेला परिणाम याचेदेखील मुलांनी सादरीकरण केले. चिडखोर, भांडखोर स्वभाव मनुष्याच्या प्रगतीत कसा बाधक होतो, मुलगा-मुलीमध्ये भेदभाव करू नका, आदी संदेश मुलांनी नाटकातून देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे दिला गाव स्वच्छतेचा संदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 2:35 PM