अकोला : सद्या आकाशातून पाऊस बरसत असतानाच पूर्वेस उल्का वर्षावाचा अतिशय मनोहारी आकाश नजारा शुक्रवार २७ व शनिवार २९ जुलै असा दोन दिवस पाहता येणार आहे.
शुक्रवार २८ जुलै आणि शनिवार २९ जूलै रोजी पूर्वेला रात्री साडेदहा नंतर कुंभ राशी समूहातून विविध रंगांच्या उल्का पडताना दिसतील. यांना आपण तारा तुटला असे म्हणतो. परंतु त्यांचा व तार्यांचा काही एक संबंध नसून त्या आकाशातील वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने पेट घेतात. काही धूमकेतू किंवा लघु ग्रहांचे अवशेष आपल्याला दर ताशी २० या प्रमाणात तूटताना पाहता येतील. सोबतीला सर्वात सुंदर वलयांकित शनी ग्रह बघता येईल. हा उल्का वर्षाव आपल्याला मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास वाढलेला पाहता येईल. या निमित्ताने दिवसा ढगातील आणि रात्री उल्कांचा पाऊस असा अनोखा अनुभव घेता येईल. त्याचा मनसोक्त आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
गुरुवारी शुक्र, मंगळ, बुध युतीगुरुवार, २७ जुलै रोजी पश्चिम आकाशात सिंह राशी समूहात लाल रंगाचा मंगळ त्याच्या जरा खालच्या बाजूला सर्वात लहान बुध ग्रह आणि सिंह राशीतील ठळक तारका मघा ही अगदी जवळ बघता येईल. जरा खालच्या बाजूला तेजस्वी शुक्र अतिशय चांगल्यापैकी दर्शनासाठी सज्ज आहे. दुर्बिणीतून बुध ग्रहाची एकादशी सारखी कला तर शुक्र ग्रहाची तृतीये सारखी आपल्या चंद्राप्रमाणे कला आपल्याला पाहता येईल.