राम देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य रेल्वेच्या मूर्तिजापूर सेक्शनमधील यावलखेड- बोरगाव मंजूदरम्यान रविवारी पहाटे तुटलेल्या रेल्वे रुळाने रेल्वे प्रशासनासमोर एक नवीन आव्हान निर्माण केले आहे. रेल्वे रुळांची नियमित सूक्ष्म चाचणी घेतली जात असतानासुद्धा असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक रेल्वे अधिकारी संभ्रमात पडले असून, घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून तुटलेला रेल्वे रुळाचा भाग हवामानशास्त्रीय चाचणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने दर दोन महिन्यांनी रेल्वे रुळांची सूक्ष्म चाचणी घेतली जाते. सर्व शक्यता लक्षात घेऊन करण्यात येणार्या या चाचणीला ‘अल्ट्रासॉनिक टेस्ट’ असे म्हटले जाते. रेल्वे रुळावर धावणारी ट्रॉली किंवा इन्स्पेक्शन कारच्या साहाय्याने ही अतिसूक्ष्म चाचणी घेतली जाते. प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरींच्या या चाचणीमध्ये रेल्वे रुळाला पडलेल्या अत्यंत सूक्ष्म तडादेखील दृष्टीस पडतात व निकृष्ट झालेले रूळ तत्काळ बदलले जातात. गाड्यांच्या सतत अवागमनामुळे पडणारा प्रचंड भार आणि वातावरणातील बदलसुद्धा यासाठी कारणीभूत ठरतो. या सर्व बाबीमुळे कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी भुसावळ विभागात ही चाचणी नियमित केली जाते. मूर्तिजापूर सेक्शनमधील रेल्वे रुळांचीसुद्धा ही चाचणी करण्यात आली होती. असे असतानासुद्धा रविवारी पहाटे यावलखेड-बोरगाव मंजूदरम्यान डाउन मार्गावर दुरांतो आणि गरीबरथ गेल्यानंतर तुटलेल्या रेल्वे रुळाने रेल्वे प्रशासनासमोर आव्हान निर्माण केले आहे. मोठी दुर्घटना टळली असली, तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने तुटलेला रुळाचा तुकडा हवामानशास्त्रीय चाचणीसाठी मुंबईला पाठविला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकार्यांनी ‘लोकमत’ला दिली. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
ट्रॅकमन काळे यांची रेल्वे बोर्ड अवॉर्डसाठी शिफारसतुटलेल्या रुळाची माहिती दक्षतेने पोहचविणारे ट्रॅकमन किशोर काशिराम काळे यांना २ हजार रुपयांचा रोख पुरस्कार तसेच रेल्वे बोर्ड अवॉर्डसाठी शिफारस केली जाणार असल्याची माहि ती भुसावळ विभागाचे डिआरएम आर.के. यादव यांनी लोकम तशी बोलताना दिली.
दर दोन महिन्यांनंतर रेल्वे रुळांची अल्ट्रासॉनिक टेस्ट केली जा ते. घटनास्थळावरील रेल्वे रुळाचीसुद्धा ती करण्यात आली हो ती. अतिसूक्ष्म पद्धतीने केल्या जाणार्या या चाचणीमध्ये निकृष्ट होणार्या रेल्वे रुळाची स्थिती एक ते दीड वर्ष आधीच आम्हाला कळते. गस्तीवर असलेल्या ट्रॅकमॅन किशोर काळे यांच्या सतर्क तेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घडल्या प्रकारामुळे आम्हीसुद्धा संभ्रमात पडलो आहोत.- आर. एस. छाबडा,वरिष्ठ विभागीय अभियंता, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.