शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

३.६३ लाख ग्राहकांनी स्वत:हून पाठविले मीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 2:30 PM

पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वत:हून मीटर रीडिंग पाठविले आहे.

अकोला : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोला परिमंडलातील १३ हजार ७६७ वीज ग्राहकांनी तर राज्यातील ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वत:हून मीटर रीडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीज बिल दिलेले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाउनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीज बिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणेदेखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीज ग्राहकांनी सरासरीनुसार वीज बिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज ग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वत: रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रीडिंगप्रमाणे वीज वापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीज ग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर महावितरणकडून  एसएमएस पाठविला जात असून, त्यामध्ये मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीज वापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रीडिंग पाठविले आहे. महावितरणकडून प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीज ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅप व वेबसाइटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

परिमंडळनिहाय अशी आहे ग्राहकांची संख्या

महावितरणकडे स्वत:हून मीटर रीडिंग पाठविलेल्या वीज ग्राहकांमध्ये अकोला परिमंडलामधील -१३७६७, पुणे- ६९९१२, कल्याण- ५८२१०, भांडूप- ३७५४३, नागपूर- २७७२०, नाशिक- २५८३१, कोल्हापूर- २२७२८, बारामती- २०९४१, जळगाव- १७६६४, औरंगाबाद- १६३७४, अमरावती- १३५४०, चंद्रपूर- ८८२४, कोकण- ८५४२, नांदेड- ७३४८, गोंदिया- ७२६८ आणि लातूर परिमंडलामधील ६९६३ वीज ग्राहकांचा समावेश आहे.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण