अकोला : शहरालगत असलेल्या खडकी ग्रामपंचायत परिसरातील म्हाडा कॉलनीत दिवसाढवळ्य़ा वीज चोरी करत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने बुधवारी प्रकाशित करताच महावितरण खळबळून जागे झाले. वृत्ताची दखल घेते महावितरण पथकाने परिसरात धाडसत्र राबवून दोषी वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या म्हाडा कॉलनीमध्ये दिवसाढवळ्य़ा वीज चोरी होत असल्याची माहिती ह्यलोकमतह्णला मिळाली होती. या माहितीनुसार लोकमत चमूने मंगळवारी परिसराची पाहणी केली असता भरदिवसा विद्युत वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परंतु याचा भुर्दंड प्रामाणिक वीज देयक भरणार्या ग्राहकांना पडत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाही महावितरण कुंभकर्णी झोपेत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच महावितरण खळबळून जागे झाले असून, महावितरणाच्या पथकाने तत्काळ धाडसत्रास सुरुवात केली. दरम्यान, १७ घरांची तपासणी केली असता यातील ६ घरांमध्ये आकोडे लावण्यात आल्याचे आढळले. थेट विजेची चोरी करणार्या या सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तक्रारदेखील करण्यात आली आहे. तसेच दोषी वीज ग्राहकांनी चोरी केलेल्या वीज युनिटप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील महावितरणच्या अधिकार्यांनी दिली.
महावितरणचे म्हाडा कॉलनीत धाडसत्र!
By admin | Published: August 13, 2015 1:21 AM