अकोला - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला स्थित वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे व मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाणे लवकरच कार्यान्वित होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही पोलीस ठाण्यांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर झाले आहे; मात्र पोलीस ठाण्याची नियोजित जागा ही कुंभारी रोडवर अंतर्गत भागात असल्याने उद्योजक व व्यापार्यांसोबतच पोलिसांसाठी ही जागा अडचणीची ठरणारी होती. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उद्घाटन थांबले होते. या जागे ऐवजी एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी अप्पू पॉइंटनजीकची जागेची मागणी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली होती. या जागेला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यताआहे. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबरोबरच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाणेही कार्यान्वित होणार आहे. त्याचे उद्घाटन एमआयडीसी पोलीस ठाण्यासोबतच होण्याची शक्यता आहे.
एमआयडीसी व मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाणे होणार लवकरच कार्यान्वित!
By admin | Published: November 25, 2015 2:11 AM