अकोला, दि. १३- जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाला दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादक सहकारी संस्थांची ४0 दिवसांपासून थकलेली देयके संस्थांच्या शेतकरी सभासदांना सोमवारी मिळणार आहेत. लोकमतमध्ये वृत्त प्रकशित होताच संबंधित विभागाच्या अधिकार्यामध्ये खळबळ उडाली असून, शुक्रवारी दिवसभर संस्थांच्या देयकांची कागदपत्रे तयार करण्यात आली. दोन दिवस सुटी आल्याने सोमवारी देयके अदा केली जाणार आहेत.४0 दिवसांपासून दूध उत्पादक सहकारी संस्थांना देयके दिली नसल्याने जिल्ह्यातील दूध व्यवसाय कोलमडला आहे. दुग्धोपादनाचा जोड व्यवसाय करणारा शेतकरी यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. या मागे जिल्हय़ातील कार्यरत दूध उत्पादक संस्थाच बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप संस्था चालकांकडून होत आहे. जिल्हय़ातील शेतकर्यांनी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ र्मयादित अंतर्गत गावोगावी प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. शेकडो शेतकरी या संस्थांचे सदस्य असून, प्राथमिक दूध संस्थांना दूध पुरवठा ते करतात. या संस्था जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाला दूध पुरवठा करतात. संघाकडून या संस्थांना दूध पुरवठय़ाची देयके अदा केली जातात; पण एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आणि बँकेतून रोकड काढण्यावर र्मयादा आल्याने दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामध्येच संघाने कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. या संबंधीचे आदेश सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या प्राधिकृत अधिकारी समिती प्रमुखांच्या हवाल्याने दूध संघाने जिल्हय़ातील दूध उत्पादक सहकारी संस्थांना एका नोटिसद्वारे पाठवले आहेत. या आदेशानुसार संस्थेचे देयक अदा केल्यानंतर संस्थेने शेतकरी दूध उत्पादक सभासदांना कॅशलेस प्रणालीद्वारे दुधाचे देयक अदा करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी संस्थांनी कॅशलेस प्रणालीने देयके अदा केल्याची संस्थेची बँक खात्याच्या उतार्याची झेरॉक्स प्रत कार्यालयास सादर करणेही अनिवार्य केले आहे. त्यानंतरच संस्थांना पुढील देयके अदा करण्यात येणार असल्याने एका नोटिसद्वारे संघाने संस्थाना अवगत केले आहे. या सर्व परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी भांबावून गेला असून, मागील ४0 दिवसांपासून त्यांना देयके मिळाली नसल्याने त्यांची आिर्थक स्थिती बिकट झाली आहे. ज्या संस्थांनी बँक केवायसी पूर्ण केली; पण त्यांची देयके थकली त्या सर्व संस्थांना सोमवारी देयके अदा केली जाणार आहेत. जवळपास १४ लाख रुपयांची ही देयके आहेत.बी.एम. बारब्दे,व्यवस्थापक,जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ, अकोला.
दूध संस्थांना मिळणार देयके !
By admin | Published: January 14, 2017 1:28 AM