लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाने दूध पुरवठा करणार्या प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांची देयके मागील तीन आठवड्यांपासून दिले नसल्याने जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाचा जोड व्यवसाय करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यासाठी १२ जुलै रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालयाकडे धनादेश पाठविण्यात आले होते; परंतु हे धनादेश सह्याविनाच परत आले आहेत.जिल्हय़ातील शेतकर्यांनी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ र्मयादित अंतर्गत गावोगावी प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. शेकडो शेतकरी या संस्थाचे सदस्य असून, प्राथमिक दूध संस्थांना दूध पुरवठा ते करतात, या संस्था जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाला दूध पुरवठा करतात; परंतु ९ सहकारी दूध संस्थांची देयके १0 जुलैपर्यंंतची मिळाली नाहीत. त्यामुळे प्राथमिक सहकारी दूध संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. या संदर्भात पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला येथील श्रीराम सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या सांगण्यानुसार मागील तीन आठवड्यांपासून दूध विक्रीची देयके मिळाली नाहीत. कॅशलेसचे कारण सांगितले जात आहेत. या व्यवहारासाठी नेहमी बँक स्टेटमेंट काढावे लागते. संघाने एकदाचे बँकेला पत्र देऊन कळवावे. बेअरर धनादेश असेल तर देऊ नये; पण संघ अडवणूक करीत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर १२ जून रोजी संघाचे कर्मचारी देयकांचे धनादेश घेऊन अमरावतीला गेले होते; परंतु विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) हे सोमवारी अकोला येथे येणार आहेत. त्यामुळे सह्या अकोला येथे करण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.
दूध संस्थांचे धनादेश सह्याविना परतले!
By admin | Published: July 16, 2017 2:29 AM