अकोला : अकोल्यात विदर्भातील सर्वात दूध भुकटी प्रकल्प असताना येथील दूध भंडारा येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या प्रकल्पाला पाठविण्याचा दंडक दुग्ध विभागाने घेतला; पण भंडाºयाचाही प्रकल्प बंद पडल्याने अकोल्याहून पाठविण्यात येणारे दूध आता मुंबईला पाठविण्याचा निर्णय प्रादेशिक कार्यालयाने घेतला आहे.अकोल्याच्या शासकीय दूध योजनेचे दूध एप्रिलपासून भंडारा येथे बटर व दूध भुकटी बनविण्यासाठी पाठविण्यात येत आहे. भंडाºयाचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प हा भंडारा जिल्हा दूध महासंघाने भाड्याने घेतला आहे. अकोल्याला प्रकल्प असताना हा प्रकल्प सुरू करण्याऐवजी भंडाºयाला भाडेतत्त्वावर घेतलेल्या प्रकल्पाला दूध पाठविण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न दूध उत्पादकांमध्ये निर्माण झाला आहे.भंडारा येथे तयार करण्यात आलेले बटर व भुकटी उत्पादने शासनाने उचललीच नसून, भुकटी, बटर उत्पादने वाहतुकीसाठीची निविदाही अद्याप काढली नसल्याचे वृत्त आहे. या परिस्थितीमुळे भंडारा दूध योजनेला शासनाकडून मिळणारे ३६ लाखांच्यावर देयके थकली आहेत. परिणामी, अकोला योजनेच दूध भंडाºयाला पाठविणे बंद आहे. त्याचा फटका अकोला दूध संघाला बसत आहे. संघाकडून दूध योजनेला देण्यात येणारे दूध २८ व २९ आॅगस्ट रोजी घेण्याचे नाकारले. त्याचे कारण मात्र दुधात अल्कोहोलाचे प्रमाण असल्याचे सांगण्यात आले. याचा त्रास मात्र पश्चिम वºहाडातील दूध उत्पादकांना सोसावा लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.दरम्यान, अकोल्याचा दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन आश्वासन दिले होते. मागील आठवड्यात दुग्ध विकास मंत्री महादेव जाणकार यांनी या प्रकल्पाला भेट देऊ न हा प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. वºहाडातील बेरोजगार, दूध उत्पादकांना वरदान ठरणाºया या प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
- भंडाºयाचा दूध भुकटी प्रकल्प बंद पडल्याने अकोला शासकीय दूध योजनेकडे येणारे संघाचे दूध आता मुंबईला पाठविण्यात येणार आहे. एक टँकर मुंबईला रवाना केला आहे.एन.एस. कदम,प्रभारी दुग्ध शाळा व्यवस्थापक,शासकीय दूध योजना, अकोला.