शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

अकोला जिल्ह्यात दूधपूर्णा नावाने मिळणार दूध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 4:39 PM

जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेत सहा कोटी रुपये निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप योजना राबविण्यात येत असून, योजनेतील लाभार्थींची सहकारी दूध उत्पादक संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. त्या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात दूधपूर्णा उपक्रमानुसार त्याच नावाने दुधाची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी बैठकीत नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच. आर. मिश्रा यांच्यासह जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे उपस्थित होते.जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेत सहा कोटी रुपये निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात आहे. दोन दुधाळ जनावरे देण्यासाठी चिठ्ठीद्वारे सोडतीने ५२१ लाभार्थींची निवड करण्यात आली. योजनेत प्रतिलाभार्थी ८५ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. चांगल्या दर्जाच्या दोन म्हशी घेण्यासाठी आवश्यकतेएवढी रक्कम बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. वाटप झालेल्या लाभार्थींच्या म्हशीचे दर दिवशी दहा ते बारा हजार लीटर दूध संकलन होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी दूध बँक तयार करण्याचेही आधीच ठरले. लाभार्थींच्या सहकारी दूध संस्थांची नोंदणी करण्यात आली. त्या नोंदणीनुसार लाभार्थींकडून संकलित झालेले दूध या उपक्रमाच्या नावे म्हणजे, दूधपूर्णा नावाने विकले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद