लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खर्र्रा, घोटा, पानात वापरल्या जाणार्या सुपारीचा दर्जा गत काही दिवसांपासून घसरला असून लघु व्यावसायीकांची फसवणूक होत असल्याची बाब उजेडात आली आहे. सुपारीचा दर्जा अलिकडे घसरल्याची ओरड केवळ अकोल्यातचं नव्हे तर संपूर्ण विदर्भातून ऐकिवात येत असल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वतर्विली जात आहे. ईतर राज्यात कुठे न खपलेला सुपारीचा साठा विदर्भात खपवून पाच कोटीची सुपारी उतरवून कोट्यवधीचा चुना लावला गेला आहे.
युवा वर्गामध्ये मोठय़ा प्रमाणात खर्रा, घोटा खाण्याचे व्यसन आहे. गुटखा बंदी असली तरी गुटख्याच्या पुड्या सहज मिळत नसल्याने ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुनच अलीकडे तंबाखू-चुनामि२िँं१्रूँं१त सुपारी खाण्याचे प्रमाण वाढल्याने सुपारीला विदर्भात मोठी मागणी आहे. कोट्यवधींचा माल दरदिवसाला उतरविला जातो. नियमित येणार्या सुपारीला भाजून ‘भाजकी’ सुपारी केली जाते. त्यानंतर सुपारीचे तुकडे (खांड) करून ती बाजारात विकल्या जाते. गत आठवड्यात गुजरातच्या एका व्यापार्याने संपूर्ण विदर्भात निकृष्ट दर्जाची सुपारीचा पुरवठा केला आहे. या सुपारीचा वापर पान तसेच गुटख्यात सुरू झाल्यांनतर ‘पट्टीच्या’ खवय्यांना सुपारीच्या निकृष्ट दर्जाची जाणीव होताच ओरड सुरू झाली. जवळपास प्रत्येक पानटपरीवाल्याकडे सुपारीच्या दर्जाबाबत तक्रार येऊ लागल्याने ही बाब उजेडात आली. याचा मागोवा घेतला असता, गुजरातच्या एका व्यापार्याने विदर्भातील अकराही जिल्हय़ांत निकृष्ट दर्जाची सुपारी पाठविल्याचे समोर येत आहे.