शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

दोन सराफांना व्यापारी बाप-लेकांनी लाखोंनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 1:52 AM

अकोला : अकोल्यात व्यापार करणाऱ्या बाप-लेकांनी अकोल्यातील दोन बड्या सराफांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना उजेडात आली.

अकोला : अकोल्यात व्यापार करणाऱ्या बाप-लेकांनी अकोल्यातील दोन बड्या सराफांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना उजेडात आली असून, आता या बाप-लेकांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी आटापिटा सुरू आहे.हिंगणा मार्गावरील बलोदे ले-आऊटमधील व्यापारी बाप-लेकांनी घरात लग्न समारंभ असल्याचे सांगून शहरातील दोन सराफा व्यावसायिकांकडून लक्षावधीचे दागिने खरेदी केले. लक्षावधीचे दागिने खरेदी केल्यानंतर मात्र रक्कम दिली नाही. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने विश्वास ठेवून सराफांनी दागिने दिलेत; मात्र या घटनेला आता दोन महिने झाले. व्यापारी बाप-लेकांकडून दररोज नवीन कारण सांगितले जात आहे. सिव्हिल लाइन मार्गावरील एका ज्वेलर्स संचालकास तीन लाखांनी तर गांधी चौकातील ज्वेलर्सला दोन लाख रुपयांनी गंडविले. यापैकी केवळ गांधी चौकातील ज्वेलर्स संचालकास या बाप-लेकांनी धनादेश दिला आहे. दुसऱ्या ज्वेलर्स संचालकास मात्र धनादेशही दिलेला नाही. अकोल्यातील काही हुंडीचिठ्ठी व्यावसायिकासही या बाप-लेकांनी लक्षावधीने गंडविल्याचे चित्र समोर आल्याने सराफा व्यावसायिकांचेही डोळे उघडले. या बाप-लेकांच्या घरी आता दोघेही सराफा व्यावसायिक चकरा मारीत आहेत. ज्याच्याकडे धनादेश आहे, त्याने तर धनादेश अनादर प्रकरणाची तयारी सुरू केली; मात्र सिव्हिल लाइन चौकातील सराफा व्यावसायिकाकडे तारण म्हणून काहीच नाही. त्यामुळे बाप-लेकांच्या समाजाच्या एका बड्या बिल्डर्सच्या मध्यस्थीने या सराफाने लक्षावधीची ही रक्कम काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही रक्कम सरळ मार्गे निघाली नाही, तर सराफा व्यावसायिकांनी शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांच्या मध्यस्थीने रक्कम काढण्याची वेळ येईल. व्यापारी बाप-लेकांकडे घराशिवाय दुसरे कोणतेही भांडवल नसल्याने आता दिलेले कर्ज वसूल करणे जोखमीचे झाले आहे. हुंडीचिठ्ठी व्यावसायिक आणि सराफांना आपल्या रक्कम वसुलीत किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.