- राजरत्न सिरसाट
अकोला : तुरीचे मोजमाप बंद केल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या ७० टक्के शेतकऱ्यांची २० लाख क्ंिवटलवर तूर मोजणीविनाच नाफेडच्या खरेदी केंद्रावर पडून आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीसाठी मुदतवाढीची घोषणा केली पण, आदेशच काढला नसल्याने शेतकºयांच्या जीव टांगणीला लागला.पश्चिम विदर्भात मागील दोन वर्षांपासून तूर पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पण, दर कोसळल्याने शेतकºयांनी आधारभूत किमतीने राष्ट्रीय कृषी उत्पादन विकास महामंडळ (नाफेड) तूर विकण्यासाठीची एक महिना प्रतीक्षा केली. नाफेड खरेदी केंद्रावर आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल ५२५० व बोनस २०० असल्याने अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांतील पावणेदोन लाखांवर शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली; पण आजमितीस यातील ३० टक्केच तुरीचे येथे मोजमाप झाले असून, ७० टक्के शेतकरी मोजमापाच्या प्रतीक्षेत असताना तुरीचे मोजमाप बंद करण्यात आले.अकोला जिल्ह्यात ४० हजारांवर शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यातील ३० टक्केच तुरीचे मोजमाप झाले. अमरावती जिल्ह्यात ४८ हजार ८११ शेतकºयांनी तूर विक्रीची नोंदणी केली, त्यातील १९ हजार ५५ शेतकºयांच्या तुरीची मोजणी करण्यात आली असून, २९ हजार ७५६ शेतकºयांची जवळपास चार लाख क्ंिवटलवर तूर मोजणीविना पडून आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३५ हजार ६२२ शेतकºयांनी नोंदणी केली, पैकी ११ हजार ४०७ शेतकºयांच्या तुरीची मोजणी झाली नाही. बुलडाणा जिल्ह्यातील ४ हजार १३१ वर शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नाफेडकडे आॅनलाइन नोंदणी केली; पण ६० टक्क्यांवर शेतकºयांची तुर मोजविना पडून आहे. वाशिम जिल्ह्यातही तुरीचे मोजमाप थांबले आहे.दरम्यान, तुरीचे मोजमाप करू न खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाने १५ दिवस मुदत वाढवून दिल्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात आठ दिवसांपासून नाफेड खरेदी केंद्रावरील तूर मोजणीविना पडून आहे. सध्या शेत मशागतीच्या कामाची वेळ आहे, पण तूर खरेदी थांंबल्याने शेतकºयांच्या हातात पैसाच नाही. परिणामी शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून, त्याचा परिणाम शेतमशागतींच्या कामावर झाला आहे.
-केंद्र शासनाने तूर खरेदी करण्यासाठीची मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. आदेश मात्र अद्याप आले नाहीत. पण, लवकरच आदेश येण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातही ७० टक्के तुरीचे मोजमाप व्हायचे आहे.राजेंद्र तराळे, जिल्हा विपणन अधिकारी,महाराष्ट्र मार्केटिंग को-आॅप. फेडरेशन, अकोला.