शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

घंटागाडी, ट्रॅक्टरच्या इंधनावर लाखोंची उधळपट्टी; समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:23 PM

वर्षाकाठी १ कोटी ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असले तरी साफसफाईच्या कामासह इतर समस्या निकाली निघत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने १२१ घंटागाड्यांसह २० ट्रॅक्टर व भाडेतत्त्वावरील ३३ खासगी ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून, आठ जेसीबी व सहा टिप्पर आदी वाहनांचा इतर कामांसाठी वापर केला जातो. यामध्ये घंटागाड्यांचा वापर संबंधित चालक निर्धास्तपणे खासगी कामासाठी करीत असल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. या संपूर्ण वाहनांवर महापालिका प्रशासन महिन्याकाठी १५ ते १६ लाख रुपये याप्रमाणे वर्षाकाठी १ कोटी ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असले तरी साफसफाईच्या कामासह इतर समस्या निकाली निघत नसल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले आहे.प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. शहरातील सार्वजनिक जागा, मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस लाइन, नाल्यांची दररोज साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने सुमारे अकराशेपेक्षा अधिक सफाई कामगारांची नियुक्ती केली. सर्व्हिस लाइनमधून निघणारा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाच्या मालकीचे २० आणि भाडेतत्त्वावर ३३ ट्रॅक्टर कार्यान्वित केले आहेत. तसेच घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२१ पेक्षा अधिक घंटागाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्थातच, या सर्वांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची असली तरी काही कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे घंटागाडी चालकांच्या मनमानीला ऊत आला आहे.प्रभागातून जमा होणारा कचरा नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर टाकणे अपेक्षित आहे. तसे न करता बहुतांश घंटागाडी चालक सोयीनुसार शहरालगतच्या खुल्या जागा, राष्ट्रीय महामार्गालगतच्या खुल्या जागांवर कचरा टाक त आहेत. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शहराच्या चारही बाजंूनी फेरफटका मारल्यास क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक व घंटागाडी चालकांचा कर्तव्यदक्षपणा उघडकीस येईल, हे निश्चित मानल्या जात आहे.घंटागाडीच्या इंधनात गोलमाल!घंटागाडीमध्ये दररोज नेमके किती लीटर इंधन आवश्यक आहे, याचा मध्यंतरी आयुक्त संजय कापडणीस यांनी आढावा घेतला असता, मोटर वाहन विभागासह आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा पर्दाफाश झाला होता. अनेक घंटागाडी चालक वाहनातील कचरा नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक करीत नसल्याचे समोर आले. त्या वाहनाच्या डम्पिंग ग्राउंडवरील एकूण फेऱ्या तपासल्या असता, इंधनात घोळ होत असल्याचे उघडकीस आले होते.पैसे द्या, घंटागाडी उपलब्ध!घंटागाडी चालकांनी दुपारी २ किंवा ३ वाजतापर्यंत त्यांची वाहने मोटर वाहन विभागात जमा करणे भाग आहे. बहुतांश चालक ही वाहने घरी घेऊन जातात. अनेक घंटागाड्या रात्री ११ पर्यंतही शहराच्या कानाकोपºयात फिरताना आढळून येतात. अर्थात, पैसे देण्याच्या बदल्यात अनेक हॉटेलमधील शिल्लक राहिलेल्या खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावली जाते. काही वाहन चालक डुकरांचा व्यवसाय (वराह पालन) करणाऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवित असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका