संतोष येलकर/अकोला : राज्यात यंदा उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरांचे आरोग्य टिकविण्यासाठी, सुग्रास चार्यासोबतच खनिज द्रव्याचा (मिनरल मिक्श्चर) वापर पोषक ठरणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी ह्यमिनरल मिक्श्चरह्णचा पुरवठा करण्याची उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस, परिणामी शेतकर्यांच्या हातून गेलेली पिके, नापिकीमुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती अशा स्थितीत हिवाळ्यातच पाणीटंचाईसह चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकीमुळे चार्याचे उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणार्या पशुपालक शेतकर्यांसमोर चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत जनावरांना जगविण्यासाठी तो आणायचा कोठून, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. येत्या काही दिवसांत चाराटंचाईचा प्रश्न उग्र होण्याच्या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी शासनामार्फत चारा डेपो उघडण्याचे प्रस्तावित करण्यात आले. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चार्यासोबत ह्यमिनरल मिक्श्चरह्णचा पुरवठा करण्याची उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे.*मिनरल मिक्श्चरमधून मिळणारे पोषक घटक!- कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, आयरन (लोह), मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, कोबाल्ट, आयोडिन, फ्लोरीन, अँसिड, इनसोल्यूबल अँशचा-याची बचत अन् पोषक घटक!चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरांना पुरेसा आणि पोषक चारा मिळत नाही. अशा परिस्थितीत एक जनावराकरिता दररोज चार्यासोबत १00 ग्रॅम ह्यमिनरल मिक्श्चरह्ण दिल्यास चार्याची बचत होईल तसेच जनावरांना आवश्यक असलेले पोषक घटकदेखील मिळतात.
चाराटंचाईत जनावरांसाठी ‘मिनरल मिक्श्चर’ठरणार पोषक!
By admin | Published: December 19, 2014 1:06 AM