यावेळी पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे, उपमुख्य अभियंता ज्ञानेश्वर दामोधर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय जाधव उपस्थित होते. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पूरक तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करुन ऑक्सिजन उपलब्धतेची पाहणी करण्यासाठी हा दौरा असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते. यावेळी ऑक्सिजन निर्मिती व शुद्धीकरण व तयार झालेल्या ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरणे, याबाबत तज्ज्ञांनी सादरीकरण करुन माहिती दिली. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे पारस वीजनिर्मिती प्रकल्पातील विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. आशा मिरगे, नगरसेवक नितीन झापर्डे, मनोज गायकवाड, तालुकाध्यक्ष शिवाजीराव म्हैसने, उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन शेख, राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत मानकर, रुपेश फाटे, रवी तायडे, पारस पुरवठादार व कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र रौंदळे, श्याम खोपडे, सुहास लांडे, अखिल ठेकेदार, जितेंद्र काटे, सचिन खंडारे, गणेश लांडे, आकाश चावरीया, नीलेश जाधव आदींनी जोरदार स्वागत केले.(वा.प्र.)
फोटो: