बाळापूर (अकोला) : नीट परीक्षा रिपीट करण्यासाठी पालकांनी विरोध केल्यानंतर शहरातील एका अल्पवयीन मुलीने घरातील ३० हजार रुपये घेउन नागपूर गाठले. तिथे एका ओळखीच्या मुलीच्या मदतीने खासगी कोचींग क्लासला प्रवेश घेतला. दुसरीकडे तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही. त्यामुळे, घाबरलेल्या पालकांनी बाळापूर पोलिस स्टेशन गाठले. बाळापूर पोलिसांनी २४ तासात शोध लावून तिला पालकांच्या ताब्यात दिले.शहरातील एक अल्पवयीन मुलीने नुकतीच नीट परीक्षा दिली. मात्र, तिला अपेक्षेनुसार गुण मिळाले नाही. तसेच वैद्यकीय शाखेत तिला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असल्याने तिच्या पालकांनी तिला बीएसस्सी करण्याविषयी सांगितले. त्या दृष्टीने तिच्या पालकांनी हालचाली सुरू केल्या. मात्र, डॉक्टर होण्याची महत्त्वकांक्षा असलेल्या या युवतीने घरातील ३० हजार रुपये घेउन नागपूर गाठले. तिथे एका ओळखीच्या मुलीच्या मदतीने खासगी कोचींग क्लासला प्रवेश घेतला. दुसरीकडे तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही. त्यामुळे, घाबरलेल्या पालकांनी बाळापूर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. या मुलीच्या मोबाइलचे लोकेशन घेतले असता ते नागपूर चे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना तेथील नातेवाईकांसोबत संपर्क साधण्यास सांगितले.परंतु नागपूरला कोणीही जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांनी तिच्या डायरी मध्ये नोंदविलेल्या नागपूरच्या मुली सोबत संपर्क साधला असता तिने सदर मुलगी नागपूरला आल्याचे सांगितले. तसेच तिने एका खासगी कोचींग क्लासमध्ये प्रवेश घेतला असल्याचे सांगितले.त्या नंतर बाळापूर पोलीस व मुलीचे नातेवाईक हे नागपूरला रवाना झाले. नातेवाईकांच्या वारंवार येणाºया फोनमुळे सदर अल्पवयीन मुलगी घाबरली व तिने नंदनवन पोलीस स्टेशन गाठून त्यांना सर्व हकीकत सांगितली. तो पर्यंत बाळापूर पोलीस व तिचे नातेवाईक तेथे पोहचून त्यांनी तिची समजूत घालून तिला परत आणले. यावेळी बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करून त्यांची समजूत काढली. या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक गजानन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रज्जाक , राजु नागरे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
डॉक्टर होण्यासाठी बाळापूरातील अल्पवयीन मुलीने घर सोडून गाठले नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 5:46 PM
बाळापूर (अकोला) : नीट परीक्षा रिपीट करण्यासाठी पालकांनी विरोध केल्यानंतर शहरातील एका अल्पवयीन मुलीने घरातील ३० हजार रुपये घेउन नागपूर गाठले.
ठळक मुद्देतिथे एका ओळखीच्या मुलीच्या मदतीने खासगी कोचींग क्लासला प्रवेश घेतला.या मुलीच्या मोबाइलचे लोकेशन घेतले असता ते नागपूर चे असल्याचे निष्पन्न झाले.बाळापूर पोलीस व तिचे नातेवाईक तेथे पोहचून त्यांनी तिची समजूत घालून तिला परत आणले.