उरळ : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीने उरळ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावात दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात स्वयंपाक करत होती. मुलीची आई ही शेतात गेली होती. मुलीला एकटी पाहून नराधम बापाने तिला मारहाण करून बलात्कार केला. पीडित मुलीची आई शेतातून घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने आईसह उरळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच ठाणेदार अनंत वडतकर व पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच बापाला तत्काळ अटक करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव करीत आहेत.