लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : शहरातील अल्पसंख्य समाजातील अल्पवयीन मुलीची दोघांनी छेड काढल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. दरम्यान, शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता कायम राहण्यासाठी आरसीपीच्या पथकाने पथसंचलन केले. बार्शीटाकळी शहरातील अल्पसंख्याक समाजाची एक अल्पवयीन मुलगी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शाळेत जात असताना एका चहाच्या दुकानासमोर हरिकेश शशीकांत वाटमारे (२१) व त्याच्या मित्राने या मुलीची छेड काढून विनयभंग केला. ही मुले या मुलीला यापूर्वीही पाठलाग करून त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने ४ डिसेंबर रोजी बार्शीटाकळी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरिकेश शशीकांत वाटमारे व त्याच्या मित्राविरुद्ध कलम ३५४, पास्को नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हरिकेश वाटमारेला अटक केली असून, त्याचा मित्र पसार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खांडवाय करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, परिविक्षाधिन पोलीस अधिकारी राहुल धस, सहा.निरीक्षक राणे आदींनी बार्शीटाकळी येथे भेट दिली.
बार्शीटाकळी शहरात अल्पवयीन मुलीची छेडखानी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:29 AM
शहरातील अल्पसंख्य समाजातील अल्पवयीन मुलीची दोघांनी छेड काढल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. दरम्यान, शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता कायम राहण्यासाठी आरसीपीच्या पथकाने पथसंचलन केले.
ठळक मुद्देदोघांविरुद्घ गुन्हा दाखल, एकास अटक