लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता, यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ म्हणजेच २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण हे प्रकार कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधासह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊन काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काेराेना काळात यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये एकूण ३४ मुलींची नाेंद करण्यात आली आहे. २०१९ मध्ये ४८, २०२० मध्ये २७, तर मे २०२१ पर्यंत १९ मुलींचा समावेश आहे. २०१८ ते २०२१ ची आकडेवारी पाहता, दरवर्षी यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेक प्रेमप्रकरणांचाच समावेश असल्याचे तपास कार्यातून दिसून येते.
.....
काेराेना काळात काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता पाेलीस विभाग व्यस्त हाेता. पाेलिसांनी काेराेना काळात चांगले कार्य केले आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलींचे अपहरण, बेपत्ता हाेण्याचे प्रमाण कमीच आहे. ज्या तक्रारी दाखल झाल्यात, त्यात बहुतांशी प्रेमप्रकरण असे प्रकारच जास्त असतात. परंतु सर्वांचा शाेध लावण्यात आला आहे.
- संजीव राऊत
पोलीस निरीक्षक, अकोला
.....
८० टक्के मुलींचा शोध लागला
सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण १३८ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ८० टक्केच्या जवळपास आहे. केवळ २० टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही. २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या १२८ मुलींपैकी १०७ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये २९, २०१९ मध्ये ४१, २०२० मध्ये २३, तर २०२१ मध्ये १४ मुलींचा समावेश आहे. २०१९ मधील ४८ पैकी केवळ ७ मुलींचा शाेध लागला नसून चालू वर्षातील ३ मुलींचा शाेध पाेलीस विभागाकडून घेतला जात आहे.
......
शोधकार्यात अडचणी काय ?
बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते. परंतु ज्यांना सांगून जातात, ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपास कार्यात अडचणी येतात. परंतु पाेलिसी खाक्या दाखविल्याबराेबर अनेकजण पटकन सांगण्यास सुरुवात करतात.
.....
अल्पवयीन मुली बेपत्ता...
२०१८.... ३४
२०१९.... ४८
२०२०.... २७
२०२१..... १६