आकोट : तालुक्यात गौण खनिज वाहतूक व गौण खनिजांची अवैध साठेबाजी करण्याचा धंदा तेजीत आला असताना आकोट महसुल विभागाने मोहीम राबवून १९ अवैध रेतीसाठे जप्त केले. २२ वाहनांवर दंडात्मक, तर २ वाहनांवर फौजदारी गुन्हे दाखल करीत ६ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. मौजे पिलकवाडी व नखेगाव येथे नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून अवैध साठे करण्यात आले होते. महसूल पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन १९ ठिकाणचे अवैध साठवणूक केलेले रेतीसाठे जप्त करून पंचनामे केले. महसूल विभागाने शासनाच्या निर्धारित रुपये ७३१ प्रतिब्रास दरानुसार लिलावामध्ये रुपये ७५0 प्रतिब्रास प्रमाणे सर्वाधिक बोली बोलणार्या व्यक्तीजवळून गौण खनिजाची रॉयल्टी रुपये ३ लाख ८२ हजार रुपये महसूल मिळविला आहे. अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या २२ वाहनधारकांकडून २,८५,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. आकोट उपविभागीय अधिकारी शैलेष हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार के. डी. वायकोस, उविअ कार्यालयाचे समन्वय अधिकारी जी. पी. गोतमारे, मंडळ अधिकारी प्रवीण घोटकर, एस. एस. गवई , एन. डी. पवार, तलाठी दिनेश मोहोकार, अतुल वानखडे यांनी ही कारवाई केली.
गौण खनिज संपत्तीची तस्करी
By admin | Published: July 03, 2014 10:43 PM