शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

अकोला जिल्ह्यात सुरू होणार गौण खनिज ‘चेक नाके’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 1:58 PM

अकोला: गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लवकरच तालुकास्तरावर गौण खनिज तपासणी नाके (चेक नाके) सुरू करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला: गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लवकरच तालुकास्तरावर गौण खनिज तपासणी नाके (चेक नाके) सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाºयांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.वाळू, मुरूम, गिट्टी, माती इत्यादी प्रकारच्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करण्यात येते. गौण खजिनाच्या अवैध वाहतुकीमुळे स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाचा महसूल बुडतो. त्यानुषंगाने गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील तालुकास्तरावर गौण खनिज ‘चेक नाके’ सुरू करण्याची तयारी महसूल प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये लवकरच जिल्ह्यातील अकोट व बाळापूर येथे ‘चेक नाका’ सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यातही गौण खनिज ‘चेक नाके’ सुरू करण्याचे नियोजन महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.‘नाक्या’वर अशी होणार तपासणी!‘चेक नाक्या’वर येणाºया प्रत्येक गौण खनिजाच्या वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गौण खनिजाच्या वाहतूक पासची नोंदणी केल्यानंतर ती वाहतूक पास रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वाहतूक पासवर एकापेक्षा जास्त होणाºया गौण खनिजाच्या फेºयांना चाप बसणार आहे.‘सीसी कॅमेरा’चा राहणार ‘वॉच’!जिल्ह्यातील गौण खनिज ‘चेक नाक्यां’वर ‘सीसी कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. ‘चेक नाक्या’वर येणाºया प्रत्येक गौण खनिज वाहनाची नोंद झाली की नाही, यासंदर्भात लक्ष (वॉच) ठेवण्यासाठी ‘सीसी कॅमेरा’चा उपयोग होणार आहे. तसेच ‘चेक नाक्या’च्या ठिकाणी शेड आणि बॅरिकेड्स उभारण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

महसूल कर्मचाºयांसह पोलिसांचीही होणार नेमणूक !‘चेक नाक्या’वर गौण खनिजाच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच गौण खनिजाच्या ‘चेक नाक्यां’वर पोलीस कर्मचाºयांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन, ‘चेक नाक्या’वर पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे.गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर गौण खनिज ‘चेक नाके’ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपाययोजनेद्वारे गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला चाप बसेल.- आस्तिककुमार पाण्डेयजिल्हाधिकारीजिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या संकल्पनेतून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गौण खनिज ‘चेक नाका’ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.- डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयforestजंगल