लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता, सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत होते. केवळ किराणा, औषधे, दूध विक्रीची दुकाने तेवढी सुरू होती. अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अखेर बुधवारपासून शहरातील संपूर्ण बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे आता मोठ्या कालावधीनंतर बाजारपेठेतील अर्थचक्राला चांगली गती मिळणार आहे. बाजारपेठ उघडल्याने, कापड, सराफा, फूटवेअर, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक दुकानांवर खरेदीदारांची गर्दी होत असल्याचे गुरुवारी दिसून येत आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील अनेक भाग कंटेनटमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. नंतर शहरातील दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्याची परवानगी देण्यात आली. ९ जूनपासून शहरातील बाजारपेठेतील वर्दळ वाढली. आता शहरातील सुवर्णपेढ्या, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, फूटवेअरची दुकाने टप्प्याटप्प्याने उघडण्यास सुरुवात झाली आहे.गुरुवारी बाजारपेठेचा फेरफटका मारला असता, गांधी रोड, टिळक रोड, सराफा बाजार, जैन मंदिर परिसर, कापड बाजार, न्यू क्लॉथ मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती.गुरुवारी शहरातील काही मोजक्या सुवर्णपेढ्या सुरू झाल्या. या सुवर्णपेढ्यांमध्ये मोजकेच ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. दुकाने उघडल्याने, व्यापाऱ्यांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहेत. काही दिवसातच बाजारपेठेतील अर्थचक्राला पुन्हा गती मिळण्याची व्यापाऱ्यांना आशा आहे. (प्रतिनिधी)टप्प्याटप्प्याने उघडतोय सराफा बाजारलॉकडाऊननंतर शहरातील सराफा बाजार टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहे. गुरुवारी गांधी रोडवरील चार ते पाच सराफा दुकाने उघडली होती. तसेच सराफा गल्लीतील काही दुकाने उघडण्यात आली होती. अद्यापही सराफाचे शोरूम मात्र उघडण्यात आले नाहीत. हे शोरूमसुद्धा लवकरच उघडल्या जातील.सुरक्षितता पाळाशहरातील बाजारपेठ खुली झाली असून, सर्वच दुकाने टप्प्याटप्याने उघडण्यात येत आहेत. ग्राहक दिसून येत असले तरी सुरक्षिततेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक दूकांनावर सॅनिटायझरची व्यवस्था दिसून आली तर काही ठिकाणी सुरक्षितता नसल्याचे आढळले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे सुरक्षिततेबाबत निष्काळजी धोकादायक ठरू शकते.कृषी केंद्रांकडे शेतकºयांची पाठ!मृगनक्षत्राच्या सरी बरसण्याच्या अगोदर शेतकरी कृषी केंद्रांवर बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी करायचे; परंतु कोरोनाच्या धास्तीमुळे शेतकरी तालुक्याच्या, गाव पातळीवरच्या कृषी केंद्रांवरून बियाणे, खते खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे, तसेच कृषी विभागाकडून शेतकºयांना बांधावरच बियाणे, खते पुरविल्या जात आहेत.अनलॉकनंतर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एलईडी, वॉशिंग मशीनसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे. खरेदीसाठी येणाºया ग्राहकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे. हळूहळू इलेक्ट्रॉनिक बाजाराला गती मिळेल.-श्रीराम मित्तल, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायीलग्नसराईचे दिवस असतानाही, ग्राहकांची गर्दी नाही. प्रतिसाद कमी आहे. मोठ्या वस्तूंची मागणी कमी आहे. लग्नसराईसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची तेवढी खरेदी होत आहे. लॉकडाऊनमुळे फर्निचर व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.-मनोज वोरा, फर्निचर व्यवसायी
साध्या पद्धतीने लग्न होत आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. दैनंदिन ग्राहकीसारखी परिस्थिती नाही. अद्यापही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने, सराफा व्यवसायाला गती मिळालेली नाही.-नंद आलिमचंदानी, सराफा व्यवसायी
ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. गरजेपुरत्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. पाहिजे तशी ग्राहकांची गर्दी नाही. अद्यापही धोका टळलेला नसल्यामुळे ग्राहकांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे त्या दूष्टीने निेयोजन केले आहे.-भिकमचंद अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायी