लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात आढळून आलेल्या ३१ कुपोषित बालकांना सक्षम करण्यासाठी ‘मिशन झीरो’ राबविण्याला तहसीलदार डॉ.आर. जी. पुरी यांनी सुरुवात केली आहे. बोडखा डोंगरी गावातील अनिकेत राजेश सरदार आणि ऋतुजा राजेश सरदार २५ महिन्यांच्या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून पातूर आयुर्वेद विशारद डॉ. नितीन शेंडे तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. भास्कर काळे यांनी जबाबदारी स्वीकारली. पातूर तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांनी थेट बोडखा गाठले. स्वत: वैद्यकीय शास्त्रात पारंगत असल्याने कुपोषित बालकांची तपासणी केली. त्याबरोबरच पातूर तालुका प्रभारी बालविकास अधिकारी समाधान राठोड ह्यांच्याकडून माहिती घेतली. तालुक्यातील मळसूर येथील तीन, आलेगाव पाच, अंधारसांगवी दोन, चोंढी दोन, झरंडी पाच, या व्यतिरिक्त १२ मुले कुपोषित आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे
काय आहे मिशन झिरो?पातूर तालुक्यामध्ये असलेल्या कुपोषित बालकांची जबाबदारी समाजकार्य करणार्या व्यक्तींकडे विशेषत: डॉक्टरांकडे सोपवण्यात येणार आहे. या व्यक्तींना जबाबदारी दिलेल्या बालकाला सहा महिन्यांत कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची जबाबदारी स्वीकारून तहसीलदार पुरी यांनी कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यांनी कार्यही सुरू केले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना तहसीलच्यावतीने राबवण्यात येणार आहेत.
बालविकास प्रकल्प अधिकार्यांचे पद रिक्त मानवी निर्देशांक उंचावण्यासाठी शासनाचा मानव विकास मिशन कार्यक्रम गत दोन वर्षांपासून पातूर तालुक्यात कार्यान्वित आहे. मात्र, देशाच्या उज्जवल भविष्य असणारी लहान मुलांची काळजी घेणारी यंत्रणा अव्यवस्थित आहे. वर्षापासून पातूर तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे. त्याबरोबरच पातूर अणि मळसूरची पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. येथील विस्तार समाधान राठोड यांच्याकडे प्रभार देण्यात आलेला आहे. सदर अधिकार्यांचा वेळ शासकीय बैठकांमध्ये खर्च होतो. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.
पातूर तालुक्यातील कु पोषित बालके आगीखेड येथील ऐश्वर्या प्रेमसिंग तवर, शिर्ला येथील विरा अनिल दाणे, अनुष्का विशाल खंडारे, शिर्ला पट्टे अमराई येथील मिरर गोपाल चव्हाण, सना निर्दोष राजिक, दुर्गेश उमेश गाडगे, समायरा फिरदोस वसिमोद्दिन, बागायत पातूरचे प्रणव शिवाजी कुकडकर, विनीत दिनेश हिरळकार, दिग्रस बु.चेओम विनायक शेळके, तेजल शिवहरी गवई, तुंलगा खु.चे प्रांजली सुभाष सोनोने, मळसूरचे रुपेश पळसकर, अडगावचे लक्ष्मी राजेश शिरसाट, अडगावचे प्रवीण सुरेश खरात, पांगराचे आरुषी सुनील राठोड, सावरगावचे जयकुमार मनोहर चव्हाण, अंबाशीचे रितेश विजय डांगे, कार्लाचे संदेश कैलास चव्हाण, पिंपळडोळीचे राहुल गजानन खुळे, पाचरणचे प्रथमेश बंडू ससाने, पळसखेडचे श्वेता रोहिदास चव्हाण, प्राप्ती रवींद्र जाधव, बाभूळगावचे नयन योगेश खिल्लारे, आस्था गोरखनाथ खिल्लारे, देऊळगावचे असिका मंगेश राऊत, पूर्वी विनायक उपर्वट, भंडारजची आरुषी धर्मदास इंगळे, भानोसचे विष्णू विठ्ठल राठोड, प्राची संदीप चव्हाण आणि बोडख्याचे अनिकेत आणि ऋतुजा राजेश सरदार आदी बालके कुपोषित आहेत.