लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : साेशल मीडियाचा याेग्य वापर केल्यास त्यामधून चांगल्या माहितीचे आदानप्रदान केले जाऊ शकते; परंतु काही जण याचा गैरवापर करीत असल्याचे सायबर सेलकडे आलेल्या तक्रारीवरून समाेर आले आहे. साेशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी यावर्षी १८ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरण हे साेशल मीडियावरील फेसबुक, व्हाॅट्सॲपवर, इन्स्ट्राग्रामवर धार्मिक भावना दुखावतील, राजकीय तसेच सामाजिक तेढ निर्माण हाेणाऱ्या पाेस्ट टाकल्याच्या घटनांचा अधिक समावेश आहे.
सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर हाेत आहे किंवा नाही, यावर पोलीस विभागाचा सायबर सेल करडी नजर ठेवून आहे. कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणे, तयार करणे गुन्हा असून, नागरिकांनी फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साइट्सवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर सायबर सेलच्यावतीने कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
.............
गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट
साेशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या गंभीर स्वरूपातील पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर काही राजकीय, सामाजिक भडकाऊ पाेस्ट टाकून वातावरण बिघडविणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना ताकीद देऊन साेडण्यात आले.
............
वर्षात सर्वाधिक गुन्हे वादग्रस्त पाेस्ट टाकणारे
साेशल मीडियाचा गैरवापार करून ऑनलाइन फसवणुकीचा एक गुन्हा वगळता जवळपास सर्वच गुन्हे फेसबुक, व्हाॅट्सॲपवर राजकीय, धार्मिक पाेस्ट टाकून वातावरण बिघडविण्याचे कार्य करण्यात आले आहे. याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. यामध्ये फेसबुकचा वापर सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात सायबर सेलकडे या वर्षात तब्बल २५० च्यावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ १८ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामधील ०८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. २५० पेक्षा जास्त तक्रारी झाल्यानंतर ते प्रकरण तातडीने उघडकीस आणल्यामुळे या प्रकरणात गुन्हे दाखल झाले नाहीत.
२०१९ १७ गुन्हे
२०२० नाेव्हेंबर १८ गुन्हे
कुठल्या महिन्यात सर्वाधिक गुन्हे
जानेवारी ०१
फेब्रुवारी ०२
मार्च ०२
एप्रिल ०३
मे ०१
जून ०२
जुलै ०३
ऑगस्ट ०१
सप्टेंबर ०१
ऑक्टाेबर ०२