शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कामगारांच्या कोट्यवधीच्या रकमेचा शासनाकडून गैरवापर - कमांडर अशोक राऊत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:21 IST

कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी देशभरात लढा उभारण्यात येत आहे, अशी माहिती ईपीएस ९५च्या राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिली.

- संजय खांडेकर

अकोला: देशातील कोट्यवधी कामगारांची १७ लाख कोटीची रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा असून, त्याचा गैरवापर होत आहे. शासनाने व्याजाच्या रकमेतून नियोजन जरी केले तरी सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळू शकते; मात्र शासनाचे त्याकडे लक्ष नाही. हा गैरवार थांबविण्यासाठी आणि कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी देशभरात लढा उभारण्यात येत आहे, अशी माहिती ईपीएस ९५च्या राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिली. अकोल्यातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनाच्या निमित्ताने ते शुक्रवारी आले असता, त्यांच्याशी लोकमतने साधलेला खास संवाद.प्रश्न : कामगारांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबत शासनाच्या कोणत्या गाइडलाइन्स आहेत, त्या पाळल्या जातात का?उत्तर : कामगारांना उदरनिर्वाहासाठी योग्य सेवानिवृत्ती वेतन मिळावे म्हणून शासनाने १९९१, २००१, २०१४ मध्ये वारंवार बदल केले आहे.पगाराच्या बारा टक्केपेक्षा दहा टक्के जास्त रक्कम देण्याची शासनाची घोषणा होती. ती मोडीत काढली गेली आहे. सत्तावीस हजार सेवानिवृत्ती वेतन मिळणाऱ्याच्या वारसदारालादेखील तेवढीच रक्कम मिळेल असे ठरले होते. सोबतच शेवटी २७ लाखही देण्याची योजना होती; मात्र ही रक्कम कुणालाच मिळाली नाही. योजना पूर्ण पाळल्या जात नाही.

प्रश्न : ईपीएफची १७ लाख कोटीची रक्कम कशी जमा आहे, त्याचे नियोजन कसे होऊ शकते?उत्तर : भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली प्रत्येक कामगाराच्या पगारातून १२ टक्के रक्कम कापल्या जाते. कामगारांच्या एकूण संख्येनुसार सरकारकडे १७ लाख कोटी आहे. या रकमेवर शासनास व्याजाच्या रूपात ४० हजार कोटी रुपये मिळतात. त्याचे योग्य नियोजन केले तर याच रकमेतून सेवानिवृत्तधारकांना त्यांच्या हक्काची रक्कम सहज दिल्या जाते; मात्र शासनाने याकडे लक्ष दिलेले नाही.प्रश्न : सरकार चिटफंड चालवित आहे, असा तुमचा आरोप कसा आहे?उत्तर : देशातील कामगारांच्या भविष्यासाठी सरकार दर महिन्याला पगाराच्या १२ टक्के रक्कम कापून घेते. यामध्ये बारा टक्के कंपनी-सरकारची रक्कम असते. या रकमेवर दिले जाणारे व्याज त्या तुलनेत मिळत नाही. आपल्याकडे फंड मॅनेजमेंट नसल्याने कामगारांना आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना हक्काचा पैसा मिळत नाही. कंपनी आणि उद्योजक धार्जिणे शासन आणि अधिकारी आहे. त्यामुळे आम्ही सरकार चिटफंड चालवित आहे, असा आरोप करतो.प्रश्न : पेन्शनधारकांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागते कारण काय?उत्तर : पेन्शनधारकांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भाग लक्षात न घेता शासनाने काही कठोर नियम लावले आहे. जे कर्मचारी तोकडा पगार घेतात त्यांना देखील शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. पाच हजारांच्या आत दरमहा सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्यांना श्रावणबाळ आणि बीपीएलच्या योजना दिल्या जात नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे.

प्रश्न : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेशी पेन्शनर्सची तुलना कशी करता?उत्तर : उपरोक्त योजनेत १०० रुपये दरमहा भरणाºया असंघटित कामगारास ३० वर्षानंतर ३ हजार दिले जात आहे. दुसरीकडे ५३१ रुपये दरमहा भरणाºया कामगाराला ३५ वर्षानंतर किती रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळते, याचे नियोजन नाही. अशा कामगारांना किमान १७,५०० सेवानिवृत्ती वेतन मिळाले पाहिजे. या न्यायिक मागणीसाठी देशभरात आम्ही लढा देत आहोत.

प्रश्न : सेवानिवृत्त कामगारांच्या वेतनाबाबत भगतसिंग कौशरिया समितीचे मत काय?उत्तर : भगतसिंग कौशरिया समितीने सेवानिवृत्त कामगारांच्या वेतनाबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहे. देशातील कामगारांना दिल्या जात असलेले सेवानिवृत्ती वेतन हे अमानवीय आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील आता आपला शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आमची लढाई ही योग्य आणि न्यायिक आहे. समितीचे मत योग्य आणि न्यायिक आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत