लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आलेला २0 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुट ख्याचा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी पहाटे छापा टाकून जप्त केला.एमआयडीसीतील गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना रविवारी रात्री मिळाली. त्यांनी या परिसरात पाळत ठेवून ठिकाण निश्चित माहि ती होताच छापा टाकला. या गोदामातून २0 लाख रुपयांचा प्र ितबंधित असलेला गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यात गुटखा बंदी झाल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात गुटखा साठय़ाची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याचे या कारवाईने पुढे आले आहे. विशेष पथकाने छापा टाकल्यानंतर २0 लाख रुपयांचा गुटखा गोदामातून जप्त केला आहे; मात्र सदर गोदाम कुणाचे आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. हा गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. विशेष पथकाने यापूर्वी ७0 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला होता, त्यानंतर आणखी १५ लाख रु पयांचा गुटखा साठा जप्त केला व सोमवारी पहाटे २0 लाख रु पयांचा गुटखा साठा जप्त केल्याने गत एका महिन्यात तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्यासह पथकाने केली.
एमआयडीसीत २0 लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:08 PM
महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आलेला २0 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुट ख्याचा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी पहाटे छापा टाकून जप्त केला.
ठळक मुद्देएमआयडीसीतील गोदामात आढळला प्रतिबंधित गुटख्याचा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पथकाची कारवाई