लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड शहरात ५ सप्टेंबरपासून ‘जनता कफ्यू’ची हाक देण्यात आली. पहिल्या व दुसºया दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. दरम्यान, तिसºया दिवशी ७ सप्टेंबर रोजी शहरातील जवळपास २५ टक्के दुकाने उघडण्यात आल्याने जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या दुकानांवर नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून आले. या घटनेची व्यापारी संघटनेने दखल घेत दुकानदारांशी चर्चा सुरू केली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रिसोडकरांची चिंताही वाढली आहे. रिसोड शहरासह ग्रामीण भागातही ३५० च्या वर कोरोनाबाधितांची संख्या गेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी महासंघ व नगर परिषदेने पुढाकार घेत ५ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यूची हाक दिली. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवली जात आहेत. दरम्यान, तिसºया दिवशी ७ सप्टेंबर रोजी शहरातील जवळपास २५ टक्के दुकाने उघडण्यात आल्याने तेथे वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दुकाने उघडणाºया दुकानदारांशी चर्चा केली जाईल, असे व्यापारी संघटनेचे सारंग जिरवणकर यांनी सांगितले.
आणखी २३ जण कोरोना पॉझिटिव्हरिसोड शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ७ सप्टेंबर रोजी ६० प्रलंबित चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आणखी ४० जणांचा चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे काळाची गरज ठरत आहे.