रात्री ८ वाजताच बाजारपेठ बंद
अकोला : शहरात रात्रीची संचार बंदी लागू झाल्याने, शुक्रवारी रात्री ८ वाजताच शहरातील बाजारपेठ बंद झाल्याचे चित्र दिसून आले. यासोबतच शहरातील विविध भागांतील दुकानेही बंद झाल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. पोलिसांकडूनही व्यावसायिकांना तसे निर्देश देण्यात आले.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
अकोला : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला. त्याचा फटका आरोग्यालाही बसला असून, अनेकांना सर्दी, खोकल्यासह हलक्या तापीचे लक्षणे दिसून येत आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
बाजारपेठेत गर्दी कायमच
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश आहेत. मात्र, बाजारपेठेत अनेक जण गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासह गल्ली-बोळीतही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.