असे का होते
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील पेशन्स कमी झाला आहे. सर्वकाही एका क्लिकवर मिळत असल्याने कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याची त्यांच्यात सवय राहिली नाही.
लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. मेमरी आहे तेवढीच आहे, मात्र कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत.
सर्वांची मेमरी आहे तशीच राहते. मेंदूचा वापर न केल्यास त्याची वाढ किंवा त्याचा गरजेनुसार विकास होत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टी लक्षात ठेवण्याची शक्ती त्यांच्यात कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हे टाळण्यासाठी
मुलांना वेळ देणे सर्वच घरात शक्य नाही.
पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे.
ॲक्टिव्हली त्यांच्यासोबत प्रत्यक्ष सहभागी होणे गरजेचे आहे.
मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या खेळामध्ये पालकांनी सहभागी व्हावे.
मुलांना शारीरिक व्यायामाची गरज आहे. त्यामध्येही पालकांचा सहभाग हवा.
मोबाईल वापरण्याचा वेळ निश्चित असायला हवा.
मुलांसमोर पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा.
मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण...
आजोबा
आमच्या काळात मोबाईल नव्हते. त्यामुळे कुठल्याही विषयाकडे अभ्यासपूर्ण लक्ष दिले जात होते. त्याचा उपयोग गणितासारख्या विषयात आणि नंतर व्यावहारिक जीवनात झाल्याची माहिती विठ्ठल पडोळे यांनी दिली.
आई
मागील वर्षभरापासून मुलाची शाळा बंद आहे. शाळेचे वर्ग हे ऑनलाइन होत असल्याने मुलाच्या हाती मोबाईल द्यावा लागला. कमी वयात जास्त काळ मोबाईल मुलांच्या हाती देणे योग्य नसल्याने आम्ही देखील घरामध्ये मोबाईलचा वापर टाळतो. मी स्वत: मुलांची शिकवणी घेत असल्याने मोबाईलचा वापरही कॉलिंगपुरताच केला जात असल्याचे पूनम पडोळे यांनी सांगितले.
लहान मुलगा
शाळा बंद असल्याने वर्ग मोबाईलवरच होतात, मात्र त्यानंतर आईबाबा मोबाईलला हात लावू देत नाहीत. त्यामुळे अभ्यास झाल्यावर सायंकाळी सायकलिंग किंवा क्रिकेट खेळत असल्याचे शिवम पडोळे याने सांगितले.
मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही पेशन्सची कमी झाली आहे. त्यांना सर्वकाही एका क्लिकवर मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविण्याची गरज आहे. तसेच कुटुंबात मोबाईलचा वापर कमी करण्याची गरज आहे.
- डॉ. शिल्पा तायडे, मनसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला