शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

एका महिन्यात ४ लाखांवर वीज ग्राहकांनी नोंदविले मोबाईल क्रमांक

By admin | Published: July 06, 2017 7:54 PM

विदर्भातीत १६ लाख ग्राहक झाले ‘अपडेट’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज देयकाची रक्कम, किती युनिटचा वापर झाला, खंडितवीज पुरवठा यासंदभार्तील माहिती एसएमएस च्या माध्यमातून मिळत आहे. १ जून २०१७ पासून १ जुलै २०१७ या एका महिन्यातच तब्बल ४ लाख १२ हजारापेक्षा अधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केल्याची माहिती समोर आली आहे.महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कायार्लायांतर्गत असलेल्या विदभार्तील तब्बल १६ लाख ५१ हजार ५४९ ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. अद्यापही एकून ग्राहकांपैकी केवळ ३४.९७ टक्के ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला असला तरी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागिल महिन्याभरात याकडे विशेष लक्ष केंद्रीत केल्याने केवळ जून महिन्यात मोबाईल नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांच्या संख्येत ८.७४ टक्क्यांची घसघसित वाढ झाली आहे. वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांक नोंदणीत नागपूर परिमंडलाने आघाडी घेतली आहे. यात नागपूर शहर मंडलातील १ लाख ११ हजार ४६४ ग्राहकांनी, नागपूर ग्रामिण मंडलातील १ लाख ४९ हजार २२८ तर वर्धा मंडलातील २ लाख ९ हजार ६६५ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर मंडलातील १ लाख ८९ हजार ९७५, गडचिरोली मंडलातील ९४ हजार ४४१ ग्राहकांनी, गोंदीया परिमंडलांतर्गत असलेल्या गोंदीया मंडलातील ८५ हजार ६०८, तर भंडारा मंडलातील ७० हजार ६०८ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या अकोला मंडलातील १ लाख ४८ हजार ३७० ग्राहकांनी, बुलढाणा मंडलातील २ लाख ८ हजार ७५३ ग्राहकांनी तर वाशिम मंडलातील ४७ हजार ४४७ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंद केली आहे. याचसोबत अमरावती परिमंडलांतर्गत असलेल्या अमरावती मंडलातील २ लाख ११ हजार ८१ ग्राहकांनी तर यवतमाळ मंडलातील १ लाख २५ हजार २११ ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत महावितरणच्या एसएमएसच्या माध्यमातील सर्व सेवा मोबाईलवर मिळविणे सुरु केले आहे.