शहरातील माेबाइल चाेरीच्या घटना
२०१९ ३७८
२०२० १६७
२०२१ १५४
चाेरी नव्हे गहाळ म्हणा
अनेक वेळा माेबाइल चाेरी न हाेता ताे गहाळ हाेत असल्याचेही किस्से समाेर आले आहेत. माेबाइल चाेरी झाला तर पाेलीस चाेरीचा गुन्हा दाखल करतात; मात्र अनेक वेळा दुकानात खरेदी करताना किंवा बाहेर जाताना माेबाइल त्याच ठिकाणी विसरत असल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे माेबाइल चाेरी नव्हे तर गहाळ झाला असे म्हणा. पाेलीसही अशाच प्रकारे नाेंद करतात; मात्र आता बहुतांश प्रकरणात माेबाइल चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने तसेच या चाेरट्यांचा सायबर पाेलिसांकडून शाेध घेण्यात येत असल्याने या माेबाइल चाेरीवर अंकुश लागल्याचे वास्तव आहे.
या भागामध्ये माेबाइल सांभाळा
शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजेच टिळक राेड, गांधी राेड, गांधी चाैक, किराणा बाजार, कपडा बाजार, जनता भाजी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, जुने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, सराफा बाजार यासह अकाेट फैल, खदान या ठिकाणी माेबाइल सांभाळून वापरा. अन्यथा तुमचा माेबाइल चाेरी हाेण्याची दाट शक्यता आहे. यासह आकाेट शहरातील साेनू चाैक, मूर्तिजापूरमधील शुक्रवार व मंगळवार बाजार, तेल्हारा शहरातील मुख्य बाजारपेठ, पातूर शहर, बार्शीटाकळी शहर, बाळापूर शहरातील काही भागातही माेबाइल सांभाळून वापरावा, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.