अकोला, दि. ३१- मोबाइल चोरीला गेल्याने मूर्तिजापूर येथील एका व्यापार्याने अकोला आगाराची बस आणि त्यामधील प्रवाशांना तब्बल एक तास वेठीस धरले. ही घटना सोमवारी सायंकाळी मूर्तिजापूर बसस्थानकावर घडली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.राज्य परिवहन महामंडळाची अकोला आगाराची एमएच १४-बीटी ३९९0 क्रमांकाची बस अकोल्याकडून- यवतमाळकडे सायंकाळी निघाली. या बसमध्ये मूर्तिजापूर येथील व्यापारी यांचा मोबाइल चोरीला गेला. त्यांनी मूर्तिजापूर येथील बसस्थानकावर ही बस रोखून धरली. एकाही प्रवाशाला खाली उतरू दिले नाही. दरम्यान, मूर्तिजापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना येथे यायला उशीर झाल्याने तब्बल एक तास प्रवाशांना वेठीस धरले गेले. त्यानंतर पोलिसांनी येऊन प्रत्येकाची झाडाझडती घेतली. यामध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश होता. व्यापार्याने वेठीस धरून एक तास प्रवाशांचा गमाविला. या प्रकाराची तक्रार करण्यासाठी काही जागरूक प्रवाशांनी धाव घेतली; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइलच्या एका चोरीच्या घटनेमुळे सर्व प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला. व्यापार्याच्या व्यक्तीगत दुर्लक्षामुळे अनेक जण आपल्या नियोजित ठिकाणी एक तास उशिराने पोहोचले.
मोबाइल चोरीमुळे बसमधील सर्व प्रवाशांना धरले वेठीस!
By admin | Published: November 01, 2016 2:07 AM